SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: स्थापना, कार्य आणि महत्त्व

जाहिरात

 

पोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजली

schedule12 Oct 26 person by visibility 169 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिनानिमित्त सकाळी ७.३० वाजता कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलिसांचे स्मरण

१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभरात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना या दिवशी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

देशातील पोलीस व तत्सम दलांतील अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होऊन हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत.

‘हॉट स्प्रिंग्ज’ येथील शौर्याची स्मृती

२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. २० ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी २१ ऑक्टोबर १९५९ रोजी भारत-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २२ जवानांची तुकडी रवाना झाली होती.

या तुकडीवर ‘हॉट स्प्रिंग्ज’ येथे चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तुकडीतील १० जवान हुतात्मा झाले, पाच जवान जखमी झाले, तर सात जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या शूर जवानांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो.

या दिवशी देशभरातील पोलीस मुख्यालयांमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात येते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes