SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: स्थापना, कार्य आणि महत्त्व

जाहिरात

 

सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटील

schedule12 Oct 26 person by visibility 199 categoryशैक्षणिक

🔸डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत

कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्र आरोग्य आणि देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे  क्षेत्र आहे रुग्णसेवेचा माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध होते. या क्षेत्रातील सखोल ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी एक आदर्श डॉक्टर बनावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.

हॉटेल सयाजी येथे आयोजित डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या  प्रथम वर्ष एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ ‘दिक्षारंभ’  मध्ये  ते बोलत होते.

 यावेळी व्यासपीठावर विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.  वैशाली गायकवाड, डॉ. अनिता गुणे आदी उपस्थित होते.

 डॉ. पाटील म्हणाले,  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व चांगल्या सुविधा देण्यावर आमचा नेहमीच भर आहे. अनुभवी व तज्ज्ञ स्टाफ, आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे  मेडिकल कॉलेज आज देशात २३ व्या स्थानी पोहोचले आहे. जिल्ह्यात तब्बल ४९५ डॉक्टर हे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.  डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये गोरगरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. यामुळे रुग्णांना दिलासा मिळतोच, शिवाय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभव शिक्षण मिळते. संस्थेमध्ये  उपलब्ध जागतिक दर्जाच्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करा. चांगले शिका, नवीन गोष्टींचा अनुभव घ्या आणि एक उत्तम माणूस आणि संवेदनक्षम डॉक्टर बना. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मानसिक धीर देऊन त्यांचा विश्वास संपादन करा आणि भविष्यात आदर्श डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करा.

विश्वस्त वृषाली पृथ्वीराज पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केवळ चांगले गुण मिळवण्यावरच भर न देता ज्ञान, शिस्त, मुल्य आणि संस्कारांची जोपासना करावी. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, शिक्षकांचा आदर व  ध्येयावर लक्ष ठेवून वाटचाल करावी.  

विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र केवळ व्यवसाय नसून, ती समाजाप्रती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. या क्षेत्रात काम करताना डॉक्टरांनी प्रामाणिकपणा आणि मूल्यांची जपणूक करून रुग्णांच्या मनामध्ये आपल्याविषयी ठाम विश्वास निर्माण केला पाहिजे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक दबाव न घेता योग्य नियोजन करून अभ्यास करावा. उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करून चांगला श्रोता बनावे आणि नेहमी नैतिक मूल्यांचे पालन करा. कम्युनिटी लर्निंगसाठी समाजात जाऊन काम करावे.  डॉक्टर बनण्याचा हा शैक्षणिक प्रवास अधिक संस्मरणीय करा.

अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यानी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सर्व विद्यार्थी त्यांच्या मेहनत आणि कष्टाच्या जोरावर येथे पोहोचले आहेत. हेच विद्यार्थी भविष्यात समाजाची प्रामाणिकपणे सेवा करणारे उत्तम डॉक्टर घडतील, याचा विश्वास वाटतो. 

लेफ्टनंट कर्नल डॉ. ओमप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना हॉस्टेल व्यवस्थापन व कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली.
उप अधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांनी अभ्यासक्रम रचना, नियोजन याबाबत माहिती दिली.

◼️उत्कृष्ट कार्याचा गौरव
यावेळी जागतिक टॉप संशोधकांच्या यादीत स्थान मिळवणारे डॉ  सी. डी. लोखंडे,  डॉ. पी. सी. पाटील, डॉ विश्वजित खोत, डॉ जयंत गुंजकर  डॉ. अर्पिता तिवारी, डॉ. उमाकांत पाटील, डॉ. प्रवीण पवार तसेच मेडिकल कॉलेज हॉस्टेल उभारणीमध्ये विशेष योगदान देणारे अजय डोईजड, प्रवीण झोले, प्रकाश नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. अनिता गुणे यांनी आभार मानले यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, यांच्यासह मान्यवर, नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes