SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: स्थापना, कार्य आणि महत्त्व

जाहिरात

 

धरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणी

schedule12 Oct 26 person by visibility 197 categoryआरोग्य

◼️आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ६ हजार ३२४ वर

धरणगुत्ती : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगुत्ती येथे आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात ५३० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२४ नागरिकांची बीपी, शुगर व एक्स-रेसह आरोग्य तपासणी, तर २०६ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या अभियानांतर्गत विविध गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

धरणगुत्ती येथील शिबिरात ५३० नागरिकांनी तपासणी करून घेतली. धरणगुत्ती येथील शिबिरातील लाभार्थ्यांची संख्या विचारात घेता, या आरोग्य अभियानांतर्गत आजअखेर एकूण ६ हजार ३२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

 ग्रामीण भागातील नागरिकांकडून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेळी संजय अण्णासो पाटील, राजू पाटील, अण्णासो पाटील, कुमार पाटील, संजय कोळी, संजय पाटील, लक्ष्मण केरीपाळे, संजय कोरे, ग्रामसेवक केंबळे, परशुराम यशवंत, भाऊसाहेब नरदे, अशोक कांबळे, अण्णासो आरगे, चिमा आरगे, अण्णाप्पा खोत, पिंटू कांबळे, रावसो अतिग्रे, सुहास भापकर, रोहित पाटील, भाऊसो जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes