SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरणकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: स्थापना, कार्य आणि महत्त्व

जाहिरात

 

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना 'कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर'

schedule12 Oct 26 person by visibility 128 categoryसामाजिक

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या दसरा महोत्सवा अंतर्गत मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत "कोल्हापूर चित्रनगरीची नागरिकांना सफर" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक आणि पर्यटकांसाठी चित्रनगरी परिसर विनामूल्य पाहता येणार आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 'कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महोत्सवा अंतर्गत कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना चित्रपटसृष्टीतील कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि मोलाच्या योगदानाची माहिती व्हावी, यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नवरात्र उत्सव आणि दसरा महोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या कला आणि चित्रपट परंपरेचा अनुभव घेण्यासाठी सर्व नागरिक व पर्यटकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा करमणूक कर विभाग व व्यवस्थापक, कोल्हापूर चित्रनगरी, मोरेवाडी, ता. करवीर यांच्या समन्वयाने आयोजित या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी कार्यासन ७ अ, करमणूक कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, दूरध्वनी क्र.: ०२३१-२६८०७९१, ई-मेल: entkolhapur@gmail.com येथे संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes