संजीव देवरुखकर यांना जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार जाहीर
schedule14 Aug 25 person by visibility 146 categoryसामाजिक

▪️प्रेस फोटोग्राफर्स व प्रेस क्लब तर्फे 'अजिंठ्याचे अंतरंग' विषयावर प्रसाद पवार यांची प्रकट मुलाखत तर संजीव भोर याचा विशेष सत्कार
कोल्हापूर : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर्स यांच्यातर्फे देण्यात येणारा प्रेस फोटोग्राफर 'जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव' पुरस्कार संजीव देवरुखकर यांना देण्यात येणार आहे. कुलपती डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते वितरण होणार आहे. तर यावेळी 'अजिंठ्याचे अंतरंग' विषयावर अजिंठ्याचे संशोधक संवर्धक फोटोग्राफर आणि चित्रकार प्रसाद पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
लेण्यांमधील चित्रांचे गेली २७ वर्षे संवर्धन करत आहेत. त्याया कामाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही गौरव केला आहे. ग्लोरियस अजंठा हे त्यांचे प्रदर्शन गाजले होते. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि निसर्ग आणि वन्यजीव फोटोग्राफर संजीव भोर याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रेस फोटोग्राफर क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, संचालक , प्रेस फोटोग्राफर पाडुरंग पाटील, आदित्य वेल्हाळ , दीपक जाधव, मोहन मेस्त्री उपस्थित होते.
▪️कोल्हापुरातील जुन्या कॅमेऱ्याचे संग्राहक असलेले संजीव देवरुखकर यांचा जन्म १९५२ साली कोल्हापूर येथे झाला. लहानपणापासून फोटोग्राफी आणि कॅमे -याचे आकर्षण असल्यामुळे सातारा येथील प्रसिद्ध असलेले भुरके आर्ट्सचे बी. जी. भुरके यांच्याकडे फोटोग्राफी आणि डार्क रूम प्रोसेसिंगचा अनुभव व संपूर्ण ज्ञान मिळवले. याच काळात कोल्हापुरातील कॅमेरा रिपेअरर जगदीश चव्हाण यांच्याकडे फोटोग्राफी आऊटडोर फोटोग्राफी व कॅमेरे रिपेअरीचे ज्ञान माहीती घेतली. १९७२ साली फ्रीलान्स प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सुरु केले. दैनिक सत्यवादी व दैनिक समाज या सारख्या वृत्तपत्रांसाठी आणि नंतर सकाळ, लोकसत्ता, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत येथे फ्रीलांस प्रेस फोटोग्राफर म्हणून काम केले.
कॅमेराचा संग्रह
जुन्या काळातील मामिया, हसेलब्लाड, ब्रोनिका, सिनार, लिनहोफ अशाप्रकारच्या हाय-एंड असे कॅमेरे आहेत. सध्या १२०० पेक्षा जास्त कॅमेरांसह छायाचित्रण क्षेत्रातील जवळपास ४००० वस्तूंचा संग्रह त्यानी केला आहे.
▪️विशेष सत्कार
सध्या कोल्हापूर येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करणारे संजीव भोर हे वन्यजीव छायाचित्रकार आहेत. त्यांना निसर्गाचे सौंदर्य टिपण्याचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. वन्यजीवांबद्दलच्या त्यांना आवड असुन, त्यांनी भारत आणि आफ्रिकेत वन्यजीवाची चित्तथरारक क्षणांचे छायाचित्रण केले आहे. त्यानी नॅशनल जिओग्राफिक फोटोग्राफी स्पर्धेत दर्शकांची पसंती विजेता २०१०, २०१२
स्माईल प्लीज - जिम कॉर्बेटमधील माकडाचे पोर्ट्रेट ला विषेश पुरस्कार
टेंडर मोमेंट - केनियातील मसाई मारा येथे चित्ता मलायका" चा तिच्या पिल्लासह हृदयस्पर्शी फोटो.
आंतरराष्ट्रीय छायाचित्रण
पुरस्कार लुसी फाउंडेशन, यूएसए - बांधवगड येथे पिल्लांसह वाघिणीसाठी निसर्ग/ वन्यजीव श्रेणीमध्ये सन्माननीय उल्लेख.