अव्यावसायिक वाहने, प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरु
schedule14 Aug 25 person by visibility 88 categoryराज्य

कोल्हापूर : भारत सरकारच्या राजपत्र अधिसुचनेनुसार 15 ऑगस्ट 2025 पासून भारतातील अव्यावसायिक (कार,जीप, व्हॅन) वाहनांसाठी, प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरु होत आहे. यामध्ये वार्षिक टोल (फास्टॅग) पासची किंमत फक्त 3 हजार रुपये आहे. ही योजना फक्त अव्यावसायिक (कार, जीप, व्हॅन) वाहनांसाठी असणार आहे. वार्षिक टोल (फास्टॅग) पासची वैधता 1 वर्ष किंवा 200 एकेरी वाहनांच्या फेऱ्यांसाठी यापैकी जे आधी होईल ते लागू असून फक्त राष्ट्रीय महामार्ग व राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावरील टोल प्लाझांसाठी वैध असणार आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील किणी टोल प्लाझा, बोरगाव टाल प्लाझा व तासवडे टोल प्लाझा वर हा वार्षिक टोल पास लागू होणार आहे.
वार्षिक टोल पास (फास्टॅग) मिळविण्यासाठी तसेच सक्रियता आणि नुतनीकरणासाठी राजमार्ग यात्रा मोबाईल अॅपवर तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाईचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी केले आहे.