कोरे अभियांत्रिकीमध्ये "डिजिटल फाऊंड्री: आयओटी, रोबोटिक्स व ऑटोमेशन यांचे एकत्रीकरण" कार्यशाळेचे आयोजन
schedule14 Aug 25 person by visibility 135 categoryशैक्षणिक

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीमधील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागास आणि एआयसीटीई कडून वाणी प्रकल्पासाठी मिळालेल्या सँक्शन मधून दि. १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत "डिजिटल फाऊंड्री: आयओटी, रोबोटिक्स व ऑटोमेशन यांचे एकत्रीकरण" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. व्हायब्रंट ॲडव्होकसी फॉर ॲडव्हान्समेंट अँड नर्चरींग ऑफ इंडियन लॅंग्वेजेस (VAANI) ही अखिल भारतीय शिक्षण परिषदेने सुरू केलेली एक योजना आहे.
ही कार्यशाळा पूर्णपणे मराठी भाषेत होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून प्रगत तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. असे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी सांगितले.
या कार्यशाळेत चंद्रशेखर डोली (अध्यक्ष, मयूरा स्टील्स प्रा. लि. , कोल्हापूर) मंगेश पाटील (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मौर्या इंडस्ट्रीज, प्रा. लि. कोल्हापूर), आदित्य पाटील (संचालक, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज लि.,कोल्हापूर), राहुल पाटील (अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमन कोल्हापूर विभाग), डॉ. एस. एस. मोहिते व डॉ. एस. एस. ओहोळ (सीओई, पुणे), मा. मोईन सिद्दीकी (सीमेन्स डिजिटल इंडस्ट्रीज सॉफ्टवेअर, पुणे), प्रा. शैलेश शिरगुप्पीकर (आरआयटी, सांगली), मा. सी. पी. महाजन (सीईओ, डॉल्फिन लॅब, पुणे) यासारख्या देशातील नामवंत उद्योगपती, संशोधक आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक फाउंड्री इंडस्ट्रीज मधील प्रॅक्टिशनर सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे, अध्यक्ष, डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू वारणा विद्यापीठ यांनी शुभेच्छा दिल्या. डीन डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभागप्रमुख डॉ. पी. व्ही . मुळीक आणि अकॅडेमिक को-ओर्डीनेटर प्रा. जी. एस. कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून डॉ. मुकुंद धुत्तरगांव आणि सह-समन्वयक म्हणून डॉ. एस. व्ही. लिंगराजू हे काम पाहत आहेत.