वाहनधारकांना दिलासा : HSRP बसविण्यासाठी मुदतवाढ
schedule14 Aug 25 person by visibility 240 categoryराज्य

कोल्हापूर : दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना HSRP बसविण्याचे कामकाज बाकी असल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकान्वये सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नव्याने अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
दिनांक १ डिसेंबर २०२५ पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट इत्यादी वाहन संदर्भातील कामे वाहनांना HSRP बसविल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येतील, याबाबतची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.