केएमसी कॉलेजच्यावतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन
schedule14 Aug 25 person by visibility 126 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज एनसीसी विभागाच्यावतीने 78 व्या स्वतंत्र अमृतमहोत्सवा निमित्त 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्यावतीने हर घर तिरंगा या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली धोत्री गल्ली, गंगावेश, पंचगंगा हॉस्पिटल या मार्गावर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एन.उलपे, प्रा.रवींद्र मांगले, एनसीसी, एनएसएस, महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी ऑफिसर, एन.एस.एस.प्रकल्प अधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर व कर्मचाऱ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.
सदर रॅलीसाठी प्रशासक कै मंजूलक्ष्मी, 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगिया, उपायुक्त कपिल जगताप, प्राचार्य डॉ.बी.एन.उलपे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन कॅप्टन डॉ अमित रेडेकर, प्रा.एसटी धुर्वे, प्रा.रविंद्र मांगले, प्रा.एस.पी.कांबळे, प्रा.किरण भोसले, प्रा.युवराज मोटे, प्रा.राम पवार यांनी केले.