मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे रविवार, 2 मार्चपासून प्रारंभ
schedule28 Feb 25 person by visibility 422 categoryसामाजिक

कोल्हापूर : हिलाल कमिटी (चांद कमिटी)ची बैठक आज शुक्रवारी मौलाना मन्सूर आलम कासमी यांचे अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डीग, कार्यालयामध्ये सायंकाळी मगरीब नमाज नंतर झाली. या बैठकीमध्ये मुंबई हिलाल कमिटी, अमारते शरीआ पटना, देवबंद, बेंगलोर, लखनौ, दिल्ली, रत्नागिरी, या सर्व शहरातील हिलाल कमिटी तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. सदर ठीकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने तरावीहची नमाज पठण शनिवार 1 मार्च रोजी व रविवार दि. 2 मार्च रोजी पासून रमजान रोजे सुरू होत असलेबाबतचा निर्णय उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केले.
सदर प्रसंगी मौ. इरफान कासमी, मौ नाझिम पठाण, मौ अब्दुलसलाम कासमी, मौ अ. रऊफ नाईकवडे, काजी अश्रफ, हाफीज समीर, जाफरबाबा सय्यद, मौ अब्दुल वाहीद सिद्दीकी, मुफ्ती ताहीर तसेच कोल्हापूर शहर व उपनगरातील सर्व मसजिदचे पेशइमाम, मुस्लिम बोडींगचे सर्व पदाधिकारी संचालक तसेच अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
याबाबतचे निवेदन हिलाल कमिटी (चाँद कमिटी) कोल्हापूर चे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
