शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
schedule29 Aug 25 person by visibility 108 categoryसामाजिक

कोल्हापूर : हॉकीचे जादूगार म्हणून जगद्विख्यात असणारे भारताचे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ.एन.डी.पाटील, किरण पाटील, राजेंद्र रायकर, राम पवार, सुचय खोपडे, बृहस्पती शिंदे, मनीषा शिंदे, कृष्णात पाटील यांच्यासह क्रीडा अधिविभागाचे विद्यार्थी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.