आझाद मैदानावर भगव वादळ : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही : मनोज जरांगे
schedule29 Aug 25 person by visibility 117 categoryराज्य

मुंबई : मराठा आरक्षण घेतल्याशिवाय इथून हालणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. ते म्हणाले की, 'डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचे नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे कुणीही वागायचे नाही. कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली. उपोषण सुरू करताना त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले. 'सरकारने सहकार्य केले आणि आपणही त्यांना सहकार्य करू. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही. पोलिस बांधवांना सहकार्य करा.' असे सांगत मनोज जरांगे यांनी सर्वांना संयम ठेवण्यास सांगितला आहे. मागणी मान्य होईपर्यंत मुंबई सोडायची नाही, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.
सरकारने सहकार्य केल्याबद्दल जरांगेंनी आभार मानत सांगितले की, 'आपलं मुंबईत यायचे ठरलं होतं. आझाद मैदानात उपोषण करायचं हे ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण इथे आलोय. आपलं उपोषण सुरू आहे.
जरांगेनी मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, 'कुणी जाळपोळ दडगफेक करायची नाही. सोमवारी-मंगळवारी महाराष्ट्राने सहकार्य नाही केले तर मुंबईमध्ये पुन्हा यायचे. आरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, शांततेत राहून सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची.
दरम्यान आझाद मैदानावर हजारो संख्येने मराठा आंदोलन सहभागी झाले असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.