कोल्हापुरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस अटक
schedule29 Aug 25 person by visibility 268 categoryगुन्हे

कोल्हापूर : मोका गुन्हयातील जामीनावर आलेल्या, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने ही कारवाई केली.
27 ऑगस्ट रोजी गणेश आगमन मिरवणुकी दरम्यान आसु बादशहा शेख रा दौलतनगर कोल्हापूर याच्यावर पोलीस रेकॉर्डवरील व मोका सारख्या गुन्हयातुन जामीनावर बाहेर आलेल्या शुभम अजित हळदकर या आरोपीने खुनी हल्ला करुन त्यास गंभीर जखमी केले होते. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
तपास पथकाने कदंलगाव येथे सापळा रचुन आरोपी शुभम अजित हळदकर वय 26 रा. दौलतनगर कोल्हापूर यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्यानंतर आरोपी शुभम हळदकर यास ताब्यात घेवुन राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर करणेत आले आहे, पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करीत आहे. आरोपी शुभम अजित हळदकर याचेवर मोका सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार , व अपर पोलीस अधीक्षक , डॉ. बी. धीरजकुमार सतो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, अरविंद पाटील यांनी केली आहे.