SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस अटक शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात'कॉसमॉस' चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ : नविद मुश्रीफ; गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेटवारणा विद्यापीठाच्या वारणा स्कूल ऑफ लॉ प्रवेशासाठी शेवटची संधी; नवीन नोंदणी व विकल्प अर्जासाठी तारखा जाहीरआझाद मैदानावर भगव वादळ : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही : मनोज जरांगे राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला : आमदार सतेज पाटील; रेखांकन बदलून कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्गकरवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास 143.90 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्तकोल्हापुरात दीड दिवसाच्या 389 गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक इराणीखणीमध्ये विसर्जनकळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून 31 टँकरच्या 98 फेऱ्याद्वारे विविध भागात पाणीपुरवठा

जाहिरात

 

'कॉसमॉस' चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’

schedule29 Aug 25 person by visibility 193 categoryशैक्षणिक

▪️लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
▪️डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सोमवारी २० वा स्थापना दिवस

कोल्हापूर : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२५- २६ साठीचा "डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार" कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जाहीर झाला आहे. सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी दिली. या समारंभाला  डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची उपस्थितीत राहणार आहे. 

 सोमवारी विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन व विद्यापीठ गीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी जीवन गौरव पुरस्कारासह, आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.

   जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणारे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मि‍लींद काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत चार्टर्ड अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, एमबीए फायनान्स आणि पत्रकारिता असे पाच व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. १९८३ साली त्यांनी स्वतःची चार्टर्ड अकाउंटन्सी प्रॅक्टिस सुरू केली. १९९९ पासून ते कॉसमॉस बँक संचालक तर २०१५  पासून बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी महिलांसाठी विशेष कर्ज योजना राबवून १५०० हून अधिक बचत गटांना आर्थिक सहाय्य केले. काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेला २०२३-२४ या वर्षासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार मिळाला. बँकिंग फ्रंट मासिकाने अलीकडेच जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.  बँकिंग सेवा, अर्थकारण, व्यवस्थापनसह विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल  सीए मिलिंद काळे यांची विद्यापीठातर्फे यावर्षीच्या 'डॉ. डी वाय पाटील जीवन गौरव' पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.  

आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आहेत. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसमध्ये विविध पदांवर काम केले.  सध्या ते महासंचालक (कर्मचारी आणि संघटन) म्हणून कार्यरत असून यापूर्वी दिल्ली मुख्यालय येथे मेजर जनरल म्हणून काम केले. बागडोग्रामध्ये ६०० खाटांच्या तर पुण्यात ११०० खाटांच्या कमांड हॉस्पिटलचे त्यांनी नेतृत्व केले आहे.  उच्च जोखीम प्रसूती, गाइनॉकॉलॉजी कॅन्सर, वंध्यत्व, युरोगायनॅकोलॉजी याचबरोबर 2 हजाराहून अधिक  हायस्टेरोस्कोपिक व शेकडो मोठ्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसमध्ये रोबोटिक सर्जरीची सुरुवात केली.  त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल ‘अति विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘विशिष्ट सेवा पदक’, ‘रक्षा मंत्री ट्रॉफी’ने त्यांना सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. शर्मा व डॉ. भोसले यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes