कळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून 31 टँकरच्या 98 फेऱ्याद्वारे विविध भागात पाणीपुरवठा
schedule28 Aug 25 person by visibility 248 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेकडून युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आज दिवसभरात महापालिकेच्या तसेच खाजगी टँकरद्वारे सायंकाळी 7.00 पर्यंत एकूण 31 टँकरच्या 98 फेऱ्याद्वारे विविध भागात पाणीपुरवठा करण्यात आला.
कळंबा फिल्टर हाऊस येथून खाजगी 16 व महापालिकेचे 2 असे 18 टँकर सोडण्यात आले असून त्यांनी सायंकाळपर्यंत 56 फेऱ्या मारल्या. तर बावडा फिल्टर हाऊस येथून खाजगी 11 व महापालिकेचे 2 असे 13 टँकर कार्यरत राहून त्यांनी एकूण 42 फेऱ्या करून नागरिकांना पाणीपुरवठा केला.
या संपूर्ण टँकर नियोजनाची पाहणी व समन्वयासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी सकाळपासूनच कार्यरत होते.