कोल्हापुरात दीड दिवसाच्या 389 गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक इराणीखणीमध्ये विसर्जन
schedule28 Aug 25 person by visibility 205 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज शहरामधील दीड दिवसाच्या 389 गणेश मूर्तींचे सायंकाळी 8.30 पर्यंत पर्यावरणपूरक इराणी खाणीमध्ये विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्यावतीने चारही विभागीय कार्यालयामध्ये ठिकठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते.
यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान अंतर्गत 246 गणेश मूर्ती, विभागीय कार्यालय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत 61 गणेश मूर्ती विभागीय कार्यालय क्रमांक 3 जगदाळे हॉल अंतर्गत 18 गणेश मूर्ती व विभागीय कार्यालय क्रमांक 4 छ.ताराराणी मार्केट अंतर्गत 64 गणेश मूर्तींचे पर्यायी विसर्जन कुंडामधील विसर्जन करण्यात आले. या गणेश मूर्तींचे महापालिकेच्या वतीने
एकत्र संकलन करून या सर्व गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक इराणी खाणीमध्ये विसर्जन करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये चारही विभागीय कार्यालय अंतर्गत 25 पर्यायी विसर्जन कुंडात व थेट इराणी खणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
सदरचे पर्यावरण पूरक विसर्जन प्रशासक के मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पवार व विभागीय कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांनी केले.