27 पर्यंत दूधगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील उपसांबदी
schedule25 May 26 person by visibility 100 categoryराज्य
कोल्हापूर : दूधगंगा धरणापासून ते सुळकूड कोल्हापूर पध्दतीचा बंधाऱ्यापर्यंतच्या दूधगंगा नदीवरील दोन्ही तीरावरील भाग, नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणी फुगवट्याच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर 25 ते 27 मे पर्यंत कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये उपसाबंदी जाहीर केली आहे.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही.
अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाने दिली .