SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्नमान्सूनपूर्व तयारीचा आढावा: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणीराधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरूडीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवडसैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखतपद्मश्री डॉ. ग. गो जाधव यांना विद्यापीठात अभिवादनकोल्हापुरात ‘चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६’ चा थरार; १७ मे पासून १० विविध खेळांचे विनामूल्य आयोजनपर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

कोल्हापुरात ‘चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६’ चा थरार; १७ मे पासून १० विविध खेळांचे विनामूल्य आयोजन

schedule20 May 26 person by visibility 212 categoryक्रीडा

कोल्हापूर : येथील नामांकित 'चालुक्याज् स्पोर्ट्स अकॅडमी'च्या वतीने १७ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत भव्य अशा “चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. नागाळा पार्क येथील 'श्री दत्त क्रीडा संकुल' (न्यू पॅलेस शेजारी, पुंगावकर मळा) येथे हा महोत्सव पार पडत असून, खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि क्रीडा संस्कृतीचा प्रसार करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य (निशुल्क) ठेवण्यात आला असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभागी व्हावे असे आवाहन अकॅडमीचे प्रमुख संतोष जगदीश बाबर यांनी केले आहे.

या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण १० विविध लोकप्रिय खेळ समाविष्ट करण्यात आले असून त्याचे अंदाजीत वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये १७ मे रोजी स्केटिंग, २१ ते २३ मे दरम्यान बास्केटबॉल, २४ मे रोजी धनुर्विद्या (आर्चरी), २५ मे रोजी जिम्नॅस्टिक्स, २६ मे रोजी कुस्ती, २७ मे रोजी बॉक्सिंग, २८ मे रोजी वेट लिफ्टिंग, २९ मे रोजी शिवकालीन मर्दानी खेळ आणि ३० मे रोजी फेन्सिंग या स्पर्धा रंगणार आहेत, तर 'वुशू' या खेळाची अंतिम तारीख लवकरच निश्चित केली जाईल. या स्पर्धा स्थानिक क्रीडा संघटना व क्रीडा प्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्या संयुक्त सहकार्यातून घेतल्या जात आहेत.

या भव्य महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक प्रा.  शिवाजी साळुंखे, अध्यक्ष  धैर्यशील पुंगावकर, उपाध्यक्ष  अवधूत साळोखे, सचिव संतोष बाबर तसेच अकॅडमीचे तज्ज्ञ प्रशिक्षक स्वरूप पाटील (स्केटिंग), शुभम पाटील (बास्केटबॉल), सौ. पुनम शिंदे (जिम्नॅस्टिक्स), सुरज खेबुडकर (आर्चरी), आदित्य खाडे (फेन्सिंग), सुहास पाटील (MMA) आणि फिटनेस टीम (मंदार चरापले, स्वरूप माने,  सोनाली मगदूम) विशेष परिश्रम घेत आहेत. या क्रीडा महोत्सवाला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजन समितीने व्यक्त केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes