SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्नमान्सूनपूर्व तयारीचा आढावा: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणीराधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरूडीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवडसैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखतपद्मश्री डॉ. ग. गो जाधव यांना विद्यापीठात अभिवादनकोल्हापुरात ‘चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६’ चा थरार; १७ मे पासून १० विविध खेळांचे विनामूल्य आयोजनपर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

राधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरू

schedule20 May 26 person by visibility 136 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : राधानगरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शासकीय वसतिगृहात अनुसूचित जाती/जमाती,अपंग, अनाथ,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त भटक्या जमाती,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 

इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक ए. जी. पाटील यांनी केले आहे.

या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून दरमहा निर्वाह,स्टेशनरी आणि गणवेश भत्ता तसेच छत्री व रेनकोट भत्ता दिला जातो.अद्ययावत संगणक कक्ष इंटरनेट सुविधेसह, सुसज्ज ग्रंथालय आणि इतर आवश्यक सुविधा ही मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes