SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्नमान्सूनपूर्व तयारीचा आढावा: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणीराधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरूडीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवडसैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखतपद्मश्री डॉ. ग. गो जाधव यांना विद्यापीठात अभिवादनकोल्हापुरात ‘चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६’ चा थरार; १७ मे पासून १० विविध खेळांचे विनामूल्य आयोजनपर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखत

schedule20 May 26 person by visibility 144 categoryराज्य

कोल्हापूर :   भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 15 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत CDS कोर्स क्र. 67 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मोफत प्रशिक्षणासाठी 8 जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस हजर रहावे.

 या कोर्स कालावधील प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील CDS -67 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत आणावयची आहे.

 एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्या संबंधीची पात्रता प्रशिक्षण प्रमाणपत्र वर्गाला येताना सोबत घेवून यावे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा उमेदवार असावा. लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परिक्षेकरिता त्याने ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटसअॅप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes