SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सन्मानाचे कवच: जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवसकाळाची क्रूर थट्टा! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची गाडी विहिरीत; ९ जणांचा दुर्दैवी अंतमोदींची १२ वर्षे म्हणजे राष्ट्रउभारणीचे महातप; भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशजीकोल्हापूर महानगरपालिका 'पथकर' आकारण्याच्या निर्णयावर उत्तम पाटील यांची नाराजीठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्तप्रलंबित बिलांमुळे ठेकेदार आर्थिक संकटात; राज्यभर एकाच वेळी आंदोलनाचा इशाराडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया; ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम एमपीएससी परीक्षा: कोल्हापुरात चोख बंदोबस्तात परीक्षा पारगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश

schedule19 May 26 person by visibility 328 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दीतील उचगाव महसुली क्षेत्रामधील गांधीनगर रोडलगतच्या मिळकतींमध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून संबंधित मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

  दरम्यान, या कारवाईविरोधात काही मिळकतधारकांनी माननीय उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर येथे याचिका दाखल करून कारवाईस स्थगिती देण्याची तसेच कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती. सदर याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी माननीय उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी संबंधित कारवाईस कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश कोल्हापूर महानगरपालिकेस दिले. संबंधित याचिकांची पुढील सुनावणी 9 जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.

या प्रकरणात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नायडू तसेच पॅनल विधिज्ञ अभिजीत आडगुळे यांनी प्रभावी बाजू मांडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes