SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागूशक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पेटला आंदोलनाचा वणवा; २१ हजार एकर जमिनीचा घास घेणाऱ्या प्रकल्पाविरोधात ९ जूनला बळीराजाचा महामोर्चापुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’लिंगनूरची तालीम आणि मैदानासाठी लागेल ते सहकार्य करू : मंत्री हसन मुश्रीफ दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय : डॉ. महादेव नरकेडी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के सांगलीतील खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयकोल्हापूर : घरफाळा देयक वितरणास सुरुवात, चालू देयकावर 6 टक्के सवलतकुटुंबाच्या आरोग्याचा भक्कम आधार: फॅमिली डॉक्टर

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

schedule19 May 26 person by visibility 329 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 19 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 2 जून च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे,

अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes