SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्नमान्सूनपूर्व तयारीचा आढावा: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणीराधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरूडीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवडसैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखतपद्मश्री डॉ. ग. गो जाधव यांना विद्यापीठात अभिवादनकोल्हापुरात ‘चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६’ चा थरार; १७ मे पासून १० विविध खेळांचे विनामूल्य आयोजनपर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

डीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवड

schedule20 May 26 person by visibility 147 categoryशैक्षणिक

  इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विभागामधील ६ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य गारमेंट उत्पादन उद्योगसमूह शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. टेक्स्टाईल क्षेत्रात उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यांचा प्रभावी संगम घडवून विद्यार्थ्यांना सक्षम अभियंता बनविण्यात डीकेटीई सातत्याने अग्रस्थानी राहिले आहे. त्यामुळेच शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपध्दतीवर उद्योगविश्‍वाने पुन्हा एकदा विश्‍वासाची मोहोर उमटवली आहे.

  शाही एक्सपोर्टसच्या शिमोगा प्रकल्पामध्ये स्पिनिंग, निटींग व प्रोसेसिंग विभागासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी कुशल व तांत्रिकदृष्टया सक्षम अभियंते निवडण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी डीकेटीईस भेट दिली रिटन टेस्ट व पर्सनल इंटरव्हयू व्दारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली व त्यातून डिप्लोमा विभागातून प्रविण पाटील, पवन यादव डिग्रीमधून ओंकार माने, केदार यादव, प्रतिक्षा कुरुंदवाडे व ऋतूराज जाधव अशा एकूण ६ विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवड केली.

  डीकेटीईमध्ये नियमित अभ्यासक्रमासोबत इंडस्ट्रियल ट्रेनिंग, सॉफट स्किल, स्किल डेव्हलपमेंट, उद्योगाभिमुख प्रात्यक्षिके, टेक्निकल वर्कशॉप, करिअर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन केले जाते. यामुळे येथील विद्यार्थी केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे तर औद्योगिक कार्यक्षमतामध्येही राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करीत आहेत.

  विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी.अकिवाटे, डिप्लोमाप्रमुख आर.के.वळसंग यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes