SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!गोकुळ दूध संघाचा ‘डेडलॉक’ दूर करण्यासाठीच सरकारची कारवाई: मंत्री हसन मुश्रीफ‘गोकुळ’ मध्येू वसुबारस निमित्त- म्हैस व गाय-वासराचे पूजन गोकुळसाठी कोल्हापूरकरांचा एल्गार! ९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघातगोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार: आमदार सतेज पाटीलमराठी रंगभूमी दिन: परंपरेचा आणि समृद्धतेचा सुवर्णसोहळादुष्काळाचा फटका बसलेल्या सहकारी संस्थांना मोठा दिलासा; निवडणुका लांबल्या तरी बसणार नाही प्रशासकाचा ससेमिरा!झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाहीमोठ्या सहकारी संघांवर थेट शासकीय नजर; ५ नामनिर्देशित सदस्यांच्या समावेशाचा मार्ग मोकळा!बुद्धिबळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऋषिकेश कबनूरकरला 'ब्रँड कोल्हापूर २०२६' पुरस्कार प्रदान!

जाहिरात

 

गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार: आमदार सतेज पाटील

schedule05 Nov 26 person by visibility 195 categoryसामाजिक

बावची : "गोकुळ आणि सहकार क्षेत्रात होत असलेल्या फसवणुकीविरोधात आमचा संघर्ष सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांच्या बळावर आम्ही या सर्व संकटांवर नक्कीच मात करू," असा ठाम विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. बावची (ता. वाळवा, सांगली)  येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले की, कोणत्याही संकटाचा सामना कसा करावा आणि त्याच्यावर मात कशी करावी, याची शिकवण आम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतूनच मिळाली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील अन्यायाविरुद्धचा हा लढा शेवटपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा सोहळा आमदार जयंत पाटील, हर्षदा देशमुख-जाधव आणि राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आमदार गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुख सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला.

या प्रसंगी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदय पाटील, डॉ. सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, वैभव शिंदे, बाळासाहेब पाटील, विजयराव यादव, संग्राम फडतारे, धैर्यशील पाटील, लालासो अनुसे, वैभव रकटे, पेठवडगावचे उपनगराध्यक्ष अभिजीत गायकवाड, डॉ. विकास बामणे, सरपंच कविता अनुसे यांच्यासह सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes