बुद्धिबळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऋषिकेश कबनूरकरला 'ब्रँड कोल्हापूर २०२६' पुरस्कार प्रदान!
schedule04 Nov 26 person by visibility 157 categoryसामाजिक
कोल्हापूर : बुद्धिबळ क्षेत्रातील उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऋषिकेश श्वेता शशिकांत कबनूरकर याला भव्य सोहळ्यात 'ब्रँड कोल्हापूर २०२६' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे आयोजित या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ लेखक 'पानिपतकार' विश्वास पाटील तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते ऋषिकेशला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना ऋषिकेशसोबत त्याची आई श्वेता कबनूरकर, वडील शशिकांत कबनूरकर, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव व त्याचे बुद्धिबळ मार्गदर्शक-प्रशिक्षक कृष्णात पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ऋषिकेशच्या या विशेष यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.