SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!, भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणारउदगावच्या कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्तमुंबईच्या मेट्रोत वारणा ब्रँडचा विस्तार/गिरगाव स्थानकात विक्री केंद्राचे उदघाटनकोल्हापुरात फुलेवाडी रिंगरोडवरील सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न; ४ तासांत आरोपी जेरबंद, १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगतशैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार!, नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाहीपदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेपगोकुळसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संताप... राजेंद्रनगर चौकात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ चा फलकप्रकाशशोधक भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन: भारतीय विज्ञानाचा देदीप्यमान तारागोकुळ दूध संघात शासकीय संचालक नियुक्त; राज्यपालांची अध्यादेशाला मंजुरीफटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!

जाहिरात

 

कोल्हापुरात फुलेवाडी रिंगरोडवरील सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न; ४ तासांत आरोपी जेरबंद, १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

schedule07 Nov 26 person by visibility 164 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फुलेवाडी रिंगरोडवरील एका सराफ दुकानात तोंडाला रुमाल बांधून आलेल्या इसमाने एअरगनचा धाक दाखवत १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने दुकानदाराची अंगठी जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या ४ तासांत शोधून अटक केली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन बालकासह दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून एकूण १,०७,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फिर्यादी गोविंद शंकारी माळी (वय ५५, रा. कात्यायणी वसाहत, कोल्हापूर) यांचे फुलेवाडी रिंगरोडवरील नानापाटील चौक येथे 'हनुमान ज्वेलर्स' नावाचे सराफ दुकान आहे. दिनांक ०४/११/२०२६ रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेला एक इसम दुकानात शिरला. त्याने खिशातील पिस्तूल काढून फिर्यादीला रोखून १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने दुकानातील ७ ग्रॅम वजनाची आणि ३,५०० रुपये किमतीची अमेरिकन डायमंड असलेली चांदीची अंगठी जबरदस्तीने घेऊन तो पसार झाला. याबाबत सराफ व्यावसायिकाने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, तीन इसम पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून फिरताना दिसले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी मोरमाने नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ संशयित इसमांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती व मोपेडची तपासणी केली असता, मोपेडच्या डिकीमध्ये एक एअरगन, चांदीची अंगठी, एक मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो डेस्टिनी मोपेड (क्र. MH-०९-HL-३४०२) असा एकूण १,०७,५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या गुन्ह्यात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे:
१. ओंकार रविकांत सोनवणे (वय १९, रा. बापुरामनगर, कळंबा, कोल्हापूर)
२. साहिल संतोष सोळंकुरे (वय १९, रा. कळंबा, कोल्हापूर)
३. एक अल्पवयीन बालक
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी अवघ्या ४ तासांत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes