SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
फटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चादुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग, सोमवारी संघर्ष मोर्चा; महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धारदिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीमसंवादातून आणि समन्वयातून उसाच्या दराचा कोंडीचा प्रश्न सुटला: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलीयड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची जयसिंगपूर मुख्य शाखा आता स्वमालकीच्या भव्य वास्तूतमहाज्योतीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरणकोल्हापूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

फटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!

schedule06 Nov 26 person by visibility 132 categoryमहानगरपालिका

◼️शाहू विद्यामंदिरात विद्यार्थी-शिक्षकांनी घेतली ‘फटाकेमुक्त दिवाळी’ची शपथ
कोल्हापूर :
दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि प्रकाशाचा सण; परंतु, वाढत्या प्रदूषणामुळे आणि फटाक्यांच्या धोक्यांमुळे आता या सणाच्या स्वरूपात बदल घडवण्याची गरज निर्माण झाली आहे. हाच उद्देश समोर ठेवून मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११, कसबा बावडा येथे नुकताच अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात ‘फटाकेमुक्त दिवाळी शपथ’ समारंभ पार पडला. यंदाची दिवाळी फटाक्यांच्या धुरात नव्हे, तर पणत्यांच्या प्रकाशात आणि प्रेमाच्या सुगंधात साजरी करण्याचा एकोणीसवा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी  जयश्री जाधव, शैक्षणिक पर्यवेक्षक  बाळासाहेब कांबळे आणि  विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शाळा ही केवळ अक्षरे शिकवणारी नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, प्राणीप्रेम आणि समाजभान घडवणारी संस्कारशाळा आहे, या भूमिकेतून हा शपथविधी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास केंद्र शाळा मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील आणि उपमुख्याध्यापक उत्तम कुंभार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी  आर. जी. कीर्तीकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शपथेचे वाचन केले. शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हात उंचावून, "आम्ही यंदाची दिवाळी फटाके न फोडता साजरी करू, हवा प्रदूषित करणार नाही, प्राण्यांना व पक्ष्यांना त्रास होऊ देणार नाही आणि इतरांनाही फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रेरित करू," अशी प्रतिज्ञा एकसुरात घेतली. चिमुकल्यांच्या तोंडून आलेला हा दृढ संकल्प पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी मुलांना फटाके न वापरण्यामागची कारणे समजावून सांगितली. फटाक्यांमुळे होणारे हवा व ध्वनी प्रदूषण, मुक्या प्राण्यांना व पक्ष्यांवर होणारा आघात, तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांची माहिती देण्यात आली. यावर विद्यार्थ्यांनी स्वतःहून रांगोळी काढणे, आकाशकंदील बनवणे, पणत्या लावणे, फराळ वाटणे आणि गरजूंना मदत करणे असे सुंदर पर्याय सुचवले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विद्या पाटील, नेमिष्टे ,  अमित पोटकुले,  आर. जी. कीर्तीकर,  उत्तम पाटील आणि दिपाली भापकर या शिक्षकांनी व शाळा समितीने विशेष परिश्रम घेतले.  प्रत्येक घरात यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी व्हावी आणि एक पणती कुणाच्या आयुष्यात प्रकाश आणो, असा संदेश देत या सोहळ्याची सांगता झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes