SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!, भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणारउदगावच्या कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्तमुंबईच्या मेट्रोत वारणा ब्रँडचा विस्तार/गिरगाव स्थानकात विक्री केंद्राचे उदघाटनकोल्हापुरात फुलेवाडी रिंगरोडवरील सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न; ४ तासांत आरोपी जेरबंद, १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगतशैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार!, नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाहीपदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेपगोकुळसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संताप... राजेंद्रनगर चौकात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ चा फलकप्रकाशशोधक भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन: भारतीय विज्ञानाचा देदीप्यमान तारागोकुळ दूध संघात शासकीय संचालक नियुक्त; राज्यपालांची अध्यादेशाला मंजुरीफटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!

जाहिरात

 

गोकुळसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संताप... राजेंद्रनगर चौकात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ चा फलक

schedule07 Nov 26 person by visibility 208 categoryराजकीय

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राज्य सरकारने गोकुळ दूध संघावर  एक शासननियुक्त आणि चार स्वीकृत संचालक नेमून त्यापैकी चार स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. शासनाने  हा अध्यादेश शुक्रवारी जारी केल्याने कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर चौकात काँग्रेस नगरसेवकांसह समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत महायुती सरकारच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

‘कोल्हापूरच्या स्वाभिमानी मतदारांच्या हक्काचा खून... भावपूर्ण श्रद्धांजली... शोकाकुल स्वाभिमानी कोल्हापूरकर’ असा लक्षवेधी मजकूर असलेला भव्य डिजिटल फलक राजेंद्रनगर चौकात उभारण्यात आला. या फलकाचे उद्घाटन करून सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या गोकुळ दूध संघाच्या9 निवडणुकीत महायुतीला १२ जागा, तर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या. त्यामुळे संघात समविचारी आघाडीने बहुमत मिळवले. त्यानंतर राज्य सरकारने गोकुळवर पाच शासननियुक्त संचालक नेमण्यासंदर्भात अध्यादेश जारी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या निर्णयामुळे गोकुळच्या सत्तेच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, शासनाच्या भूमिकेविरोधात कोल्हापूरकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्येही या निर्णयाच्या निषेधार्थ फलक उभारले जात असल्याचे चित्र आहे. राजेंद्रनगर चौकातील या फलकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, काँग्रेस नगरसेवकांसह सर्वसामान्य कोल्हापूरकरांनीही या निषेधात सहभाग नोंदवला. गोकुळच्या सत्तासंघर्षात आता शासनाच्या निर्णयाविरोधातील आंदोलनाने नवे वळण घेतले असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, राजेंद्र साबळे, नगरसेवक सचिन शेंडे, मुश्ताक मलबारी, बंटी हवालदार, संदीप बिरांजे, शशिकांत पाटील, उदय कांबळे, अमित समुद्रे, अमर साळुंखे, रोहित कांबळे, सुलतान शेख, संजय बागडी, रतन सूर्यवंशी, विशाल गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes