SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूरगगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्नएचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढमतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रमअनधिकृत कृषी ड्रोन विरोधात राज्यस्तरीय विशेष मोहिमेची मागणी; महाराष्ट्र राज्य ॲग्री ड्रोन ओनर्स असोसिएशनचे कोल्हापुरातून शासनाला साकडेएसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार; मंत्री प्रताप सरनाईककोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीर

जाहिरात

 

जिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू

schedule26 May 26 person by visibility 80 categoryराज्य

◼️शेतकऱ्यांना घरबसल्या खत आरक्षित करण्याची सुविधा

कोल्हापूर : शेतकऱ्यांना रासायनिक खत वेळेत, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा (NFSF) अंतर्गत नवीन ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली लागू करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता खतासाठी दुकानांवर रांगा लावण्याची किंवा अनेक ठिकाणी फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही.

 या नवीन डिजिटल व्यवस्थेमध्ये शेतकरी मोबाईल अ‍ॅप, CSC केंद्र, PACS संस्था, सहकारी संस्था किंवा अधिकृत खत विक्रेते यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करुन खत आरक्षित करु शकणार आहेत. शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर संबंधित दुकानातील उपलब्ध साठ्यानुसार QR कोड किंवा टोकन क्रमांक दिला जाणार असून, त्याद्वारे खत वितरित केले जाईल.

◼️प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये : शेतकऱ्यांना खत दुकानात जाण्यापूर्वीच खत उपलब्धतेची खात्री मिळणार आहे. जवळच्या उपलब्ध खत विक्रेत्याची निवड करण्याची सुविधा दिली आहे. QR कोड / टोकनद्वारे पारदर्शक वितरण. वृद्ध, दिव्यांग किंवा व्यस्त शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिनिधीद्वारे खत घेण्याची सुविधा आहे. खत साठा, विक्री व मागणी यावर शासनाचे रिअल-टाईम नियंत्रण. अनधिकृत साठेबाजी, बनावट खरेदी व जादा दराने विक्रीस प्रतिबंध केले आहे.

◼️खत मिळविण्याची प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करा,  उपलब्ध दुकान निवडा,  QR कोड / टोकन मिळवा,  दुकानात जाऊन खत घ्या. बुकिंगनंतर QR कोड दोन दिवस वैध राहणार असून, त्या कालावधीत खत उचलणे आवश्यक राहील. मुदत संपल्यानंतर बुकिंग आपोआप रद्द होऊन कोटा पुन्हा उपलब्ध होईल.

▪️कोण अर्ज करू शकतो: Farmer ID असलेले शेतकरी, जमीनधारक शेतकरी, बटाईदार / भाडेकरू शेतकरी
देवस्थान, सरकारी किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणारे शेतकरी. कोणताही खरा शेतकरी खतापासून वंचित राहणार नाही, याची शासनाने खात्री दिली आहे.

▪️अर्जासाठी आवश्यक माहिती : आधार क्रमांक, मोबाईल OTP पडताळणी, जमीन माहिती / सर्वे क्रमांक पीक माहिती  व स्वघोषणा. शासनाच्या निर्देशानुसार आधार आधारित पडताळणीमुळे खत वितरण अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेनुसारच खत उपलब्ध होईल.

▪️शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना : प्रत्येक खरेदीसाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक राहील, अर्ज केलेल्या दिवशी खत मिळणार नाही. पुढील दोन दिवसांत वितरण होईल, वैध QR कोड / टोकन शिवाय खत विक्री होणार नाही. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांनी CSC, PACS किंवा खत विक्रेत्याकडून मदत घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या नवीन डिजिटल खत वितरण व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes