SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूरगगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्नएचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढमतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रमअनधिकृत कृषी ड्रोन विरोधात राज्यस्तरीय विशेष मोहिमेची मागणी; महाराष्ट्र राज्य ॲग्री ड्रोन ओनर्स असोसिएशनचे कोल्हापुरातून शासनाला साकडेएसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार; मंत्री प्रताप सरनाईककोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीर

जाहिरात

 

गगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

schedule26 May 26 person by visibility 105 categoryसामाजिक

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत २५ मे रोजी गगनबावडा तालुक्यातील प्रत्येक गावात स्थापन असलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन तहसिल कार्यालय, गगनबावडा येथे संपन्न झाले.  

तहसिलदार रुपाली सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के, माजी अध्यक्षा बाल कल्याण समिती वैशाली बुटाले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस.एन.दाते, संरक्षण अधिकारी नवीन गुरव आदी उपस्थित होते. 

यावेळी श्रीम. सूर्यवंशी यांनी, ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य या नात्याने असणारे आपली भूमिका व कर्तव्य या बाबत मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कांबळे यांनी बालकांची सुरक्षितता व संरक्षणाच्या दृष्टीने गावातील ग्राम बाल संरक्षण समिती रचना व कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले तर बाल कल्याण समिती माजी अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी समाजामध्ये मुलींच्या बाबतीत होत असलेल्या बालविवाह या समस्येच्या अनुषंगाने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी अँड.शिल्पा सुतार यांनीही बालकांच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दाते यांनी तर गुरव यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes