SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूरगगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्नएचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढमतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम; जून ते ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार कार्यक्रमअनधिकृत कृषी ड्रोन विरोधात राज्यस्तरीय विशेष मोहिमेची मागणी; महाराष्ट्र राज्य ॲग्री ड्रोन ओनर्स असोसिएशनचे कोल्हापुरातून शासनाला साकडेएसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार; मंत्री प्रताप सरनाईककोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीर

जाहिरात

 

गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहिती

schedule26 May 26 person by visibility 98 categoryमहानगरपालिका

◼️'पीएम ई-बस सेवा' योजनेला गती, जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी कंपनीसोबत करार पूर्ण, डेपोचे काम ७५ टक्के पूर्ण
कोल्हापूर : पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने कोल्हापूर शहराने एक मोठी झेप घेतली आहे. केंद्र शासनाच्या 'PM e-Bus Sewa' योजनेंतर्गत कोल्हापूरसाठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेस येत्या सप्टेंबर महिन्यापासून शहराच्या रस्त्यांवर धावणार आहेत, असा विश्वास परिवहन समितीचे सभापती सत्यजित  जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या प्रकल्पांतर्गत बस ऑपरेटर कंपनी 'जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी प्रा.लि.' सोबत कन्सेशन अॅग्रीमेंटची (करार) प्रक्रिया पूर्ण झाली असून, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी २२ मे रोजी यास अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे कोल्हापूरच्या सार्वजनिक वाहतुकीत वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त बससेवेचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेत कोल्हापूर महानगरपालिकेला ९ मीटर लांबीच्या ५० आणि १२ मीटर लांबीच्या ५० अशा एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच परिवहन समिती सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्यजित जाधव यांनीही या कामाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

 सिव्हील डेपो डेव्हलपमेंटसाठी १७.१८ कोटी रुपये, तर 'बिहाइंड द मीटर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर'साठी १७.५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून डेपो उभारणीचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील आठवड्यात संपूर्ण डेपो परिसरातील पेव्हमेंटचे काम पूर्ण होईल.
 महाडिस्कॉमकडून ३३ केव्ही क्षमतेच्या १० किलोमीटर अंडरग्राऊंड एचटी लाईनचे काम पूर्ण झाले असून, एलटी लाईनचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. तीनपैकी दोन ट्रान्स्फॉर्मर उभारण्यात आले असून, तिसरा ट्रान्स्फॉर्मर आठ दिवसांत बसविण्यात येईल.

केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी बस ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या जेबीएम कंपनीला डेपो अलॉटमेंटचे पत्र देण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसांत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी हा डेपो प्रत्यक्ष कंपनीकडे हस्तांतरित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील इलेक्ट्रिक बसेस ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान कोल्हापूरमध्ये दाखल होतील. यामुळे डिझेलवरील खर्चात मोठी बचत होऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.

या पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सदस्य दुर्वास कदम, उमेश पोवार, मानसी लोळगे, रोहन अतिग्रे, श्रीधर गाडगीळ, प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, संतोष लाड, प्रशांत मोरे, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके तसेच अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक डॉ. विजय पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, प्रकल्प विभाग प्रमुख पी. एन. गुरव आणि केएमटीचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes