SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात'कॉसमॉस' चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ : नविद मुश्रीफ; गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेटवारणा विद्यापीठाच्या वारणा स्कूल ऑफ लॉ प्रवेशासाठी शेवटची संधी; नवीन नोंदणी व विकल्प अर्जासाठी तारखा जाहीरआझाद मैदानावर भगव वादळ : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही : मनोज जरांगे राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला : आमदार सतेज पाटील; रेखांकन बदलून कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्गकरवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास 143.90 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्तकोल्हापुरात दीड दिवसाच्या 389 गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक इराणीखणीमध्ये विसर्जनकळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून 31 टँकरच्या 98 फेऱ्याद्वारे विविध भागात पाणीपुरवठाविभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका; आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनंती

जाहिरात

 

रविवारी होणार्‍या भाजप आणि युवाशक्ती दहीहंडीला कोल्हापुरकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

schedule23 Aug 25 person by visibility 339 categoryसामाजिक

कोल्हापूर  : यावर्षी रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीनं आयोजित दहीहंडी स्पर्धा होणार आहे. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अशा युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी, यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे.

 स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुध्दा रविवारी युवाशक्ती दहीहंडीला भेट देणार आहेत. यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बक्षिसं दिली जातील. पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला, प्रोत्साहन म्हणून ५ हजार रूपये दिले जातील. तर सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपये आणि सात थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय सलामीला ८ थर लावणार्‍या गोविंदा पथकांना विशेष पारितोषिक म्हणून ५० हजार रुपये दिले जातील. सर्व गोविंदा पथकांसाठी भागीरथी महिला संस्थेकडून फुड पॅकेट वितरीत केले जातेे. तर सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी, सुरक्षेचे उपाय केले आहेत. त्यासाठी समीट अ‍ॅडव्हेंचर आणि हिल रायडरचे कार्यकर्ते सज्ज असतील. सर्व गोविंदांना १० लाख रूपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे. शिवाय यावर्षी तरूणाईच्या मागणीवरून युवाशक्ती दहीहंडी रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्वोत्तम रिल्स बनवणार्‍यांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिले जातील. प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.

दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर, युवाशक्ती दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेे आहे. उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होईल. रविवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौकात होणार्‍या युवाशक्ती दहीहंडीला कोल्हापुरच्या नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes