कोल्हापूर शहरातील विद्रूपीकरण थांबवा; माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे महापालिका प्रशासक यांना निवेदन
schedule19 Aug 25 person by visibility 685 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : 42 वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश येऊन कोल्हापूर येथे उच्च न्यायालय यांचे सर्किट बेंच सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने तसेच, श्री क्षेत्र अंबाबाई मंदिराच्या लाखो भाविकांच्या मुळे कोल्हापूरच्या पर्यटनाची तसेच शहराच्या आर्थिक उत्पन्नाचे खूप मोठे स्त्रोत्र निर्माण झाले आहे. आणि रोज हजारो पर्यटक तसेच भाविक कोल्हापूर शहराला येत आहेत . परंतु महापालिकेच्या व एम एस ई बी (MSEB)च्या काही असवेदनशील अधिकाऱ्यांमुळे कोल्हापूरच्या सौंदर्याला गालबोट लागत आहे. मी कित्येक वर्षापासून बघत आहे की पावसाळ्याच्या पूर्वी किंवा पावसाळ्यात एमएसईबी कडून कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यावरील विद्युत वाहिनी बाजू असलेल्या वृक्षांचे फांद्या छाटण्यात येतात व ते तेथेच रस्त्यावर फेकले जातात. परंतु दोन्ही खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयक साधून स्मार्ट वर्क करून एकाच वेळी फांदी छाटणे तसेच महापालिकेचा डंपर त्याचवेळी उपस्थित ठेवून ही स्वच्छता करणे हे योग्य आहे. परंतु असे न करता सदर पालापाचोळा हा आठ पंधरा दिवस रस्त्यावर पडून शहर विद्रोपीकरणाचे मुख्य कारण बनले जाते.
तरी आपण अशा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी . व ताबडतोब सदर पालापाचोळा व कचऱ्याचे ढीग ताबडतोब उचलण्याचे आदेश व्हावेत.
त्याचबरोबर कोल्हापूर वासियांचे देखील जबाबदारी वाढलेली आहे . आपण देखील रस्त्यावर उघड्यावर कचरा,प्लास्टिक, खराब साहित्य, खरमाती न टाकता, महापालिकेने केलेल्या विविध पर्यायांचा वापर करून आपली करवीर नगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन माजी महापौर निलोफर आजरेकर या करवीर नगरीची नागरिकांना या निवेदनाद्वारे केले आहे.