SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात'कॉसमॉस' चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ : नविद मुश्रीफ; गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेटवारणा विद्यापीठाच्या वारणा स्कूल ऑफ लॉ प्रवेशासाठी शेवटची संधी; नवीन नोंदणी व विकल्प अर्जासाठी तारखा जाहीरआझाद मैदानावर भगव वादळ : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही : मनोज जरांगे राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला : आमदार सतेज पाटील; रेखांकन बदलून कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्गकरवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास 143.90 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्तकोल्हापुरात दीड दिवसाच्या 389 गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक इराणीखणीमध्ये विसर्जनकळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून 31 टँकरच्या 98 फेऱ्याद्वारे विविध भागात पाणीपुरवठाविभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका; आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनंती

जाहिरात

 

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर ४ जणांची नियुक्ती, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचा समावेश

schedule13 Jul 25 person by visibility 421 categoryदेश

नवी दिल्ली : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम  यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे.

▪️उज्ज्वल निकम: मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध असलेले निकम यांनी अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये योगदान दिले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

▪️हर्षवर्धन श्रृंगला: माजी परराष्ट्र सचिव असलेले श्रृंगला यांनी अमेरिका, बांगलादेश आणि थायलंडमध्ये राजदूत म्हणून काम केले. 2023 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

▪️सी. सदानंदन मास्टर: केरळचे शिक्षक आणि भाजप सदस्य असलेले सदानंदन यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाग घेतला. 1994 मध्ये राजकीय हिंसाचारात त्यांचे दोन्ही पाय गमवले, तरी त्यांनी स्वतःला सावरले.

▪️मीनाक्षी जैन: प्रसिद्ध इतिहासकार असलेल्या जैन यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes