राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना
schedule27 Aug 25 person by visibility 210 categoryराज्य

मुंबई : गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज सकाळी राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केली .
तसेच देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठापना व आरतीला राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
▪️नाशिक कारागृहातील कैद्यांनी तयार केली राजभवनातील मूर्ती
राजभवनात प्रतिष्ठापित करण्यात आलेली गणेशमूर्ती शाडू मातीची असून ती नाशिक येथील केंद्रीय मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी साकारली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार ही पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली व राजभवन येथे पाठविण्यात आली.