हरिद्वार: मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, सात जणांचा मृत्यू
schedule27 Jul 25 person by visibility 375 categoryदेश

हरिद्वार : हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सातवा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआयला सांगितले की, हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात मोठी गर्दी जमल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला. परतलेल्या भाविकांनी सांगितले की, रविवार असल्याने मंदिर परिसर सकाळपासूनच भाविकांनी भरलेला होता. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, मनसा देवी मंदिराच्या १०० मीटर आधी जिन्यावर ही घटना घडली. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्युत प्रवाह पसरल्याच्या अफवेमुळे ही घटना घडल्याचा संशय आहे. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पदपथावरील विजेची तार तुटल्याने भाविकांमध्ये गोंधळ उडाला आहे. सध्या मंदिर परिसर भाविकांना रिकामा करण्यात आला आहे. अनेक भाविकांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.