कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून फिट इंडिया सायकल ड्राईव्ह सायल्कोथाॅन -२०२५ संपन्न
schedule24 Aug 25 person by visibility 241 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत २४ ऑगष्ट २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये सायक्लोथॉन आयोजित करणेबाबत अपर पोलीस महासंचालक, (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून सुचित करण्यात आलेले होते. सदर उपक्रमाचा उद्देश पोलीस दल व नागरिकांमध्ये " फिटनेस की डोस आधा घंटा रोज" या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे आहे. त्यानुसार आज रोजी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून सकाळी ७.०० वा अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येवून सायक्लोथॉन-२०२५ ही १० कि.मी. व २५ कि.मी. या प्रकारामध्ये आयोजित करण्यात आलेली होती.
सायबर चौक शाहू मिल्स नमुद सायक्लोवॉन ही अलंकार हॉल येथून सुरू होवून धैर्यप्रसाद हॉल चौक ताराराणी चौक टी.ए. बटालियन के.एस.बी.पी. चौक चौक पार्वती टॉकिज चौक आझाद चौक बिंदू चौक चौक सीपीआर हॉस्पिटल चौक महावीर महाविदयालय अलंकार हॉल या मार्गावर उत्साही वातारणात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज एस.पी. ऑफिस चौक मार्गे
सदरच्या सायक्लोथॉनमध्ये योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, संतोष ढोके, पोलीस निरीक्षक, राजकुमार माने, राखीव पोलीस निरीक्षक, हणमंत काकंडकी, सहायक पोलीस निरीक्षक, सागर मुत्तनवार, राखीव पोलीस उप निरीक्षक यांनी तसेच पोलीस अंमलदार, नागरिक तसेच जिल्हयातील सायकलींग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.