हातकणंगले तालुक्यात विजेच्या धक्क्याने नवाविवाहित युवकाचा मृत्यू
schedule28 Jul 25 person by visibility 442 categoryगुन्हे

शिरोली : शिरोली पुलाची माळवाडी (ता. हातकणंगले) येथे रहाणाऱ्या नवज्योत महादेव मोंगले (वय २२) या युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ६ महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की नवज्योत याने घराजवळच सर्व्हिसींग सेंटर सुरु केले होते. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नवज्योत शेतातून जनावरांना वैरण घेऊन आला आणि हातपाय धुण्यासाठी विद्युत मोटर चालू केली. त्याचवेळी मोटारीतील विजप्रवाह पाण्याबरोबर प्रवाहीत झाला आणि नवज्योतच्या हातातील पाण्याला त्याचा स्पर्श होताच विजेचा जोराचा धक्का बसून तो जागीच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयामध्ये नेले. पण डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.
अतिशय कष्टाळू, मनमिळावू स्वभावाच्या नवज्योतचा कौंटुबिक तसेच मित्र परिवारही मोठा होता. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.