पुणे-बंगळूरू महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ तरुणाचा अपघाती मृत्यू
schedule28 Jul 25 person by visibility 554 categoryगुन्हे

पेठवडगाव : पुणे-बंगळूरू महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ किणी गावातील सुशांत सुरेश पोवार (वय २३) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२८) रोजी पहाटे घडली
सुशांत हा पोलीस भरतीसाठी दररोज ट्रेकिंग व सराव करत असे. सोमवारी (दि.२८) पहाटे तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून कासारवाडीच्या डोंगर भागात ट्रेकिंगसाठी निघाला होता. मंगरायाचीवाडी फाट्याजवळ दुचाकी साईड पट्टीवरून मुख्य रस्त्यावर घेत असताना ती स्लिप झाली आणि सुशांत रस्त्यावर पडला. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेले.
घटनेनंतर त्याच्या मित्राने सुशांतला कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सुशांतने कबड्डीच्या अनेक स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला होता. त्याचा शिस्तबद्ध सराव, मेहनती स्वभाव आणि पोलीस भरतीसाठी तो प्रयत्नशील होता. मात्र नियतीने त्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच हिरावून घेतले. या दुर्दैवी घटनेमुळे किणीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.