इचलकरंजी परिसरातील "बी. के. गॅग' मधील १३ इसमांना एक वर्षाकरीता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
schedule27 Aug 25 person by visibility 344 categoryगुन्हे

कोल्हापूर : इचलकरंजी परिसरातील "बी. के. गॅग' मधील १३ इसमांना एक वर्षाकरीता कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले. हद्दपार प्रधिकारी तथा कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, योगेश कुमार यांनी ही कारवाई केली.
इचलकरंजी व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयाचे परिसरामध्ये कुख्यात असलेल्या "बी. के. गँग" या संघटीत गुन्हेगारी टोळीचा टोळी प्रमुख, १) राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे वय-४२, रा. सहकारनगर साईट न.१०२ इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. व टोळीचे सक्रिय सदस्य २) गणेश राम उर्फ संतोष कांबळे वय-२०, ३) पृथ्वीराज उर्फ भैय्या संतोष कांबळे वय-२१, ४) आदित्य अविनाश निंबाळकर वय-२०, ५) स्वप्नील सोमनाथ तारळेकर वय २०, ६) समाधान साधु नेटके वय ३९, ७) अर्जुन लक्ष्मण भोसले वय २३, ८) यश सुभाष निंबाळकर, ९) ओंकार श्रीपती ढमणगे वय २०, १०) सुमित बच्चन उर्फ राजकुमार कांबळे वय २०, ११) प्रेम शंकर कांबळे, १२) बालाजी उर्फ अविनाश अर्जुन आवळे, १३) ऋत्वीक भारत गवळी वय-२१, सर्व रा. सहकारनगर इचलकरंजी ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यानी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, पोलीस निरीक्षक, इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी यांचेकडे सादर केला होता.
चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष वेळोवेळी घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडंणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मालमत्तेस धोका निर्माण झाल्याचे तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाले.
सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरीकांचे जिवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हद्दपार प्रधिकारी तथा कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, योगेश कुमार यांनी दिनांक १९ ऑगस्ट रोजी टोळींचे प्रमुखासह १३ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन एकपाचे कालावधीकरीता हद्दपार केलेले आहे. पोलीस निरीक्षक, इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी पारित केलेल्या आदेशाची बजावणी करुन त्यांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन घालवुन दिले आहे.
हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला आढळुन आल्यास नजीकचे पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे योगेश कुमार, पोलीस अधीक्षक , कोल्हापूर यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.