SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवूखेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदनशिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडघोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदन

schedule25 Nov 26 person by visibility 333 categoryमहानगरपालिका

◼️अग्निशमन कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती, शहर हद्दवाढ आणि प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

कोल्हापूर : मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 3rd World Mayors’ Forum आणि 7th Asian Cities Summit 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोल्हापूरच्या महापौर सौ. रूपाराणी संग्रामसिंह निकम यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून त्याबाबत निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये प्रामुख्याने महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रश्न, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रलंबित प्रश्न तसेच झोपडपट्टीधारक आणि प्लॉटधारक नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबतच्या प्रश्नांचा समावेश आहे.

अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम झाल्यास त्यांच्या सेवेला स्थैर्य मिळणार असून, शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागल्यास शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे. तसेच झोपडपट्टीधारक व प्लॉटधारक नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांना अधिकृत स्वरूप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर सहभाग नोंदविताना महापौरांनी कोल्हापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

शहराचा सर्वांगीण विकास करताना पायाभूत सुविधांसोबतच नागरिकांचे हक्क, सुरक्षितता आणि मूलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची भूमिका महापौरांनी या माध्यमातून मांडली आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes