SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडघोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ राजेश चषक : जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत के एस के विजेताएकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर अभय भोसले, वेदांत बागड, रिशान पिलांकर विजेतेपदसेवा आयुष्यभराची… सुरक्षितता निवृत्तीनंतरची! जुनी पेन्शनसाठी आमदार कौस्तुभ गावडे कटिबद्ध!लोकसेवेचा वारसा व बाळासाहेबांचे विचार अखंड पुढे नेणार : आ. राजेश क्षीरसागरआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणजुगुळ-खिद्रापूर पुलाचा भूसंपादनाचा तिढा लवकरच सुटणार; आमदार यड्रावकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड

schedule25 Nov 26 person by visibility 164 categoryमहानगरपालिका

◼️नियमित करदात्यांवर अन्याय होऊ नये आणि थकबाकीदारांना सवलतीची अपेक्षा राहू नये, यासाठी महापालिकेची भूमिका

◼️नागरिकांनी त्वरीत कर भरणा करावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत घरफाळा व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये अभय योजना राबविण्यात आली होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये थकबाकीवरील दंडव्याजात ८० टक्क्यांपर्यंत, तर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ९० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली होती. या योजनांमुळे थकबाकीदारांना मोठ्या प्रमाणात दंडव्याज सवलतीचा लाभ मिळाला होता.

मात्र, नियमितपणे व वेळेत घरफाळा आणि पाणीपट्टी भरणाऱ्या करदात्यांना अशा योजनांचा कोणताही लाभ मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच वारंवार अभय योजना लागू केल्यास थकबाकीदारांकडून नियमित कर भरण्याऐवजी भविष्यात पुन्हा सवलतीची योजना जाहीर होण्याची अपेक्षा ठेवून कर भरणा पुढे ढकलण्याची प्रवृत्ती वाढू शकते. मागील आर्थिक वर्षात झालेल्या महासभेमध्ये अभय योजना वारंवार लागू करणे उचित नसल्याबाबत चर्चा झाली होती. भविष्यात अशा प्रकारची योजना लागू करू नये अशी  मान्यता देण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात दंडव्याज सवलत देण्यात आलेली असल्याने तसेच महासभेने यापूर्वीच अभय योजना लागू न करण्याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी कोणतीही अभय योजना लागू करण्यात येणार नाही. नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये आणि करदात्यांमध्ये नियमित कर भरण्याची शिस्त कायम राहावी, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. तरी नागरिकांनी त्वरीत आपला कर भरणा करावा अन्यथा संबधीतावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes