SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ राजेश चषक : जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत के एस के विजेताएकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर अभय भोसले, वेदांत बागड, रिशान पिलांकर विजेतेपदसेवा आयुष्यभराची… सुरक्षितता निवृत्तीनंतरची! जुनी पेन्शनसाठी आमदार कौस्तुभ गावडे कटिबद्ध!लोकसेवेचा वारसा व बाळासाहेबांचे विचार अखंड पुढे नेणार : आ. राजेश क्षीरसागरआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणजुगुळ-खिद्रापूर पुलाचा भूसंपादनाचा तिढा लवकरच सुटणार; आमदार यड्रावकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा घोडावत विद्यापीठाचा रिलायन्स अ‍ॅनिमेशनशी सामंजस्य करार महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी

जाहिरात

 

घोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणी

schedule25 Nov 26 person by visibility 118 categoryआरोग्य

घोसरवाड : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घोसरवाड येथे आयोजित आरोग्य शिबिरात २१४ नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ९४ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १२० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामुळे या अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची एकूण संख्या १८ हजार १५९ वर पोहोचली आहे.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

घोसरवाड येथे झालेल्या शिबिरात २१४ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. उत्तरा देवी शिंदे, विजितसिंह शिंदे सरकार, सरपंच साहेबराव साबळे, सुनील अकिवाटे, बाबासो मिसाळ, अशोक कमते, सुनील लगड, चंद्रकांत कांबळे, शंभूराज शिंदे, देवराज शिंदे, सुहास चौगुले, दिनकर गवंडी आणि राजू जुगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes