सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ
schedule25 Nov 26 person by visibility 123 categoryउद्योग
◼️ तोडग्यानुसार उर्वरित रू. १०० गाळप हंगाम समाप्तीनंतर
बेलेवाडी काळम्मा :
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालु गळीत हंगामातील एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील प्रतिटनाला रू. ३९०० प्रमाणे उसबिले जमा केली आहेत. तोडग्यानुसार प्रतिटनाला उर्वरित रू. १०० गाळप हंगाम समाप्तीनंतर दिले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर १,२०,१४५ मेट्रीक टन इतके गाळप केले आहे. सरासरी १०.३८ टक्के साखर उता-यासह १,१६,१०० क्विंटल इतकी साखर उत्पादित केली आहे. दि. एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर कालावधीत गाळप केलेल्या ५२,३०५ मेट्रीक टनाची उसबिलाची रक्कम रू. २० कोटी, ४० लाख गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहेत. संबंधित शेतक-यांनी आपापल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले आहे.
चालू हंगामात आज अखेर को-जन प्रकल्पातून ९३.६५ लाख युनिट इतकी वीज निर्मिती करून ५४.१५ लाख युनिट वीज कंपनीला निर्यात केलेले आहेत. त्याचबरोबर आसवनी प्रकल्पातून दोन कोटी लिटर्स स्पिरीट उत्पादित करण्याचे उदिष्ट ठेवलेले आहे. चालू हंगामात सरसेनापती साखर कारखान्याने नऊ लाख गाळपाचे उदिष्ट ठेवले असून शेतक-यांनी आपण पिकवलेला सपूर्ण उस सरसेनापती साखर कारखान्याकडे गाळपास पाठवावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.