खेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!
schedule26 Nov 26 person by visibility 300 categoryसामाजिक
◼️स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; ग्रामस्थांतून समाधान
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील खेबवडे येथील बुद्ध विहार परिसरातील पाणवट्याची अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था अखेर संपुष्टात येत आहे. सागर भोगम यांनी या पाणवट्याच्या स्वच्छता व दुरुस्तीबाबत ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्णत्वाकडे नेला असून, सध्या या ठिकाणी स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
खेबवडे येथील बुद्ध विहार परिसरात असलेला हा पाणवटा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आणि अस्वच्छ अवस्थेत होता. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. काही दिवसांपूर्वी सागर भोगम यांनी गावभेटीदरम्यान या पाणवट्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती.
त्यावेळी त्यांनी या पाणवट्याची संपूर्ण स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती करून तो पुन्हा नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता.
दिलेल्या शब्दाची पूर्तता करत भोगम यांच्या पुढाकारातून पाणवट्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सध्या येथील गाळ व कचरा काढून परिसराची स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
लवकरच हा पाणवटा स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे वापरण्यायोग्य होऊन ग्रामस्थांच्या सेवेत दाखल होणार आहे.
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने खेबवडे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.