SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जुगुळ-खिद्रापूर पुलाचा भूसंपादनाचा तिढा लवकरच सुटणार; आमदार यड्रावकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा घोडावत विद्यापीठाचा रिलायन्स अ‍ॅनिमेशनशी सामंजस्य करार महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत महिलांच्या व मुलींच्या सुविधांसाठी विविध विकासकामांना मंजुरी जयसिंगपूर : २ कोटींच्या निधीतून क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभशिरदवाड आणि शिवनाकवाडीच्या आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ६६२ नागरिकांची तपासणीकोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही; मात्र वारणेचे पाणी देणार नाही : हसन मुश्रीफलक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!समता, नामस्मरण आणि सेवेचा प्रकाश : गुरु नानक जयंतीकोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शनेखेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यश

जाहिरात

 

घोडावत विद्यापीठाचा रिलायन्स अ‍ॅनिमेशनशी सामंजस्य करार

schedule24 Nov 26 person by visibility 185 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डिझाईन, अ‍ॅनिमेशन आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संजय घोडावत विद्यापीठाने रिलायन्स अ‍ॅनिमेशन स्टुडिओसोबत आज सामंजस्य करार केला. यावेळी स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजोनिधी भांडारे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 या करारांतर्गत विद्यापीठात बी.डिझाईन (B.Des.) इन अॅनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्ट्स (Animation & VFX) हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चित्रपट निर्मिती (Filmmaking) या विषयांतील विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. 
       
विद्यार्थ्यांना सृजनशील शिक्षणासोबत उद्योगक्षेत्रातील व्यावहारिक अनुभव घेता येणार असून प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंट निर्मितीमधील आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक कार्यपद्धती आणि निर्मिती प्रक्रियेची माहिती मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार स्वतःला सक्षम बनवता येईल.

    या सामंजस्य कराराची प्रक्रिया विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी याबाबत सर्वांचे अभिनंदन केले आहे.

◼️या करारामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्ताराला नवी दिशा मिळेल, तसेच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सृजनशील शिक्षणाच्या क्षेत्रात ही एक नवी संधी ठरेल. 
- संजय घोडावत- संस्थापक

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes