एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर अभय भोसले, वेदांत बागड, रिशान पिलांकर विजेतेपद
schedule25 Nov 26 person by visibility 174 categoryक्रीडा
कोल्हापूर : कै. रामचंद्र दत्तात्रय कबनूरकर यांच्या स्मरणार्थ शंतनु शरद कबनूरकर व सर्वेश शरद कबनूरकर यांच्या माध्यमातून ‘अनुज चेस ॲकॅडमी’च्या वतीने आयोजित एकदिवसीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर याने ५.५ गुणांसह खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले. तर १५ वर्षांखालील गटात अभय भोसले, १२ वर्षांखालील गटात वेदांत बागड आणि ९ वर्षांखालील गटात रिशान पिलांकर यांनी बाजी मारली.
मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी श्री हरी बाळकृष्ण हवेली ट्रस्ट, कलेक्टर ऑफिस चौक, कोल्हापूर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत एकूण ७८ खेळाडू सहभागी झाले होते; यामध्ये ३० आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा समावेश होता. तेलंगणा येथील ज्येष्ठ खेळाडू श्रीनिवास लोकोजी यांचा सहभाग हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. सकाळी अनिल शहा आणि प्रकाश मेहता यांनी बुद्धिबळ पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्विस लीग (साखळी) पद्धतीने आणि प्रत्येकी १०.०५ मिनिटांच्या क्लॉक टाइमिंगनुसार खेळवण्यात आली. खुल्या गटाच्या सहा फेऱ्या बारा वर्षे गटाच्या पाच फेऱ्या पंधरा वर्षाखालील आणि नऊ वर्षाखालील गटाच्या चार फेऱ्या घेण्यात आल्या आयोजकांकडून २२,७०० रुपयांची रोख पारितोषिके, 44 ट्रॉफी, उत्तेजनार्थ देण्यात आली.
◼️गटनिहाय निकाल व विजेते
* खुला गट (ओपन) :
* प्रथम : ऋषिकेश कबनूरकर (५.५ गुण) – ₹३,००० व ट्रॉफी
* द्वितीय : सोहम खासबागदार (५ गुण) – ₹२,००० व ट्रॉफी
* तृतीय : अन्वय भिवरे – ₹१,००० व ट्रॉफी
* इतर क्रमांक : चौथा मुदस्सर पटेल (मिरज – ₹८००), पाचवा अभिषेक पाटील (मिरज – ₹७००), सहावा अरीन कुलकर्णी (₹६००). सातवा, आठवा व नवव्या क्रमांकासाठी (प्रत्येकी ₹५००) वृद्धी गायकवाड, माधव देवस्थळी व श्रीधर तावडे; दहावा क्रमांक वरद पाटील (मिरज).
* विशेष गट : महिलांमध्ये जयश्री वरणे (प्रथम – ₹५००), कविता वाळवेकर; ज्येष्ठ नागरिकांमध्ये रवींद्र कुलकर्णी (प्रथम), श्रीनिवास लोकोजी (द्वितीय); अपंग गटात अथर्व कुंभार व साक्षी गावडे.
* १५ वर्षांखालील गट :
* प्रथम (विजेता) : अभय भोसले – ₹२,००० व ट्रॉफी
* द्वितीय (उपविजेता) : सर्वेश पोद्दार – ₹१,००० व ट्रॉफी
* तृतीय : अर्णव पोर्लेकर – ₹७०० व ट्रॉफी
* चौथा : प्रथमेश व्यापारी – ₹४०० व ट्रॉफी
* मुलींमध्ये प्रथम : स्नेहल गावडे. तसेच दीपक पाटील, आर्यन पोळ, हार्दिक वडर, निर्भया आंबोळे व सोहम मांजरेकर यांचा गौरव करण्यात आला.
* १२ वर्षांखालील गट :
* प्रथम (विजेता) : वेदांत बागड (४.५ गुण) – ₹१,००० व ट्रॉफी
* द्वितीय (उपविजेता) : शिवेंद्र सिंग शिंदे (सांगली) – ₹५०० व ट्रॉफी
* तृतीय : वैष्णवी ठक्कर – ₹४०० व ट्रॉफी
* चौथा : अवनीश जितकर – ₹४०० व ट्रॉफी. पाच ते दहाव्या क्रमांकासाठी हर्षद मुकडे, अजित पाटील, सर्वेश गावडे, अविनाश तानुगडे, रणवीर पुनुगडे व अदित पाटील यांचा गौरव करण्यात आला.
* ९ वर्षांखालील गट :
* प्रथम (विजेता) : रिशान पिलांकर – ₹१,००० व ट्रॉफी
* द्वितीय (उपविजेता) : परी पाटील – ₹५०० व ट्रॉफी
* तृतीय : जयराज काजवे – ₹४०० व ट्रॉफी
* चौथा : नागनाथ मुकडे – ₹४०० व ट्रॉफी. तसेच पाच ते दहाव्या क्रमांकासाठी रियांश गिरगावकर, रिशिता देवमाने, नक्षत्र कांबळे, हर्षद मुधाळे, अभिनव चौगुले व अहिर पवार यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
* विशेष पारितोषिके : ईशान देशपांडे, श्लोक कदम, हर्ष पिस्ते, सौरव कदम व वंदना डोंगरे यांना विशेष पारितोषिकांनी गौरविण्यात आले. 4 गटात 78 खेळाडूंनी भाग घेतलेला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडूंनी 30 सहभागी झालेले
स्पर्धेचे मुख्य पंच (चीफ आर्बिटर) म्हणून कृष्णात पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक अनुज अकॅडमीचे सचिव बाबुराव पाटील शशिकांत कबनूरकर यांच्यासह सूर्यकांत चोडणकर, सर्वेश सुतार, ऋषिकेश चव्हाण आणि अनुज पाटील यांनी परिश्रम घेतले.