SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घरफाळा थकबाकीदारांच्या 2 व्यावसायिक आस्थापना सीलक्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीकेडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा; कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ ॲम्बेसेडर’मध्ये स्थानइचलकरंजीत कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा; शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण!शिक्षक मतदारसंघ निवडणूक: प्रफुल्ल तावरे यांचा जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबासुसंस्कृत समाज निर्मितीसाठी साहित्य महत्वाचे : डाॅ. हूबनाथ पांडेयमंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन!पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचारपोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

जाहिरात

 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ ॲम्बेसेडर’मध्ये स्थान

schedule21 Oct 26 person by visibility 175 categoryशैक्षणिक

◼️आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी

कोल्हापूर : बंगळुरू येथे झालेल्या इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) कॉन्क्लेव्हमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यानी टॉप २५ ॲम्बेसेडरमध्ये स्थान मिळवले.

 बंगळुरू येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटी येथे आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थी आणि ४ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.यामध्ये आयोजित ऑल इंडिया स्टुडंट, यंग प्रोफेशनल, वुमन इन इंजिनिअरिंग आणि लाइफ मेंबर्स काँग्रेस (एआयएसवायडब्ल्यूएलसी–२०२६) मध्ये देशभरातील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या श्रेयश माने याने द्वितीय क्रमांक, तर आशुतोष इंगळे याने २४ वा क्रमांक मिळवत टॉप २५ मध्ये स्थान पटकावले. विद्यार्थ्यांचा आय ट्रिपल ईच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग, नेतृत्वगुण आणि स्टुडंट ब्रँचच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल या कामगिरीतून घेण्यात आली.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटची स्टुडंट ब्रँच तुलनेने नव्याने स्थापन झालेली असून, अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील आय ट्रिपल ईच्या व्यासपीठावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. 

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील आणि आय ट्रिपल ई स्टुडंट ब्रँचचे प्रमुख डॉ. ग्रंतेज ओतारी,  समन्वयक प्रा. सतीश रणभिसे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. डॉ. शीतल दिंडे, डॉ. निलम जाधव आणि प्रा. अमृत काजवे यांनी मेंटॉर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील,  कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्टुडंट ब्रँचच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes