SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंहकोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडारात औषधांचा साठा नियमानुसार उपलब्‍ध असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत सुरुकनवाड व कुटवाड येथील आरोग्य शिबिरात ५७७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील ७ आस्थापने सीलहॉटेल्स, हॉस्पिटल्स व व्यापारी संकुलांच्या बांधकामांची कोल्हापूर महापालिकेकडून होणार तपासणीटीकेआयईटीमध्ये 'वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब'चे दिमाखदार उद्घाटनफुलेवाडीत ३० ऑक्टोबरपासून भव्य ‘फुलेवाडी महोत्सव’; विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजनगोकुळच्या नूतन संचालक मंडळाचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार८३ व्या वर्षीही अखंड भाषासेवा!पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

जाहिरात

 

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचार

schedule21 Oct 26 person by visibility 242 categoryराजकीय

◼️मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत मतदारांना मतदानाचे आवाहन
◼️भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांनी मतदानासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच मतदान करण्याचे आवाहन केले.

भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व याबाबत मतदारांशी संवाद साधत भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारातील सक्रिय सहभागाचे मतदारांनी कौतुक केले. तसेच, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes