SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घरफाळा थकबाकीदारांच्या 2 व्यावसायिक आस्थापना सीलक्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीकेडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा; कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ ॲम्बेसेडर’मध्ये स्थानइचलकरंजीत कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा; शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण!शिक्षक मतदारसंघ निवडणूक: प्रफुल्ल तावरे यांचा जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबासुसंस्कृत समाज निर्मितीसाठी साहित्य महत्वाचे : डाॅ. हूबनाथ पांडेयमंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन!पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचारपोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

जाहिरात

 

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

schedule21 Oct 26 person by visibility 165 categoryराज्य

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून पोलीस हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी यावेळी पुष्पचक्र वाहून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

विविध देशांच्या दूतावासातील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह शहीद पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांची भेट घेतली. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी पोलीस स्मृतीदिन संचलन कार्यक्रमाचे संयोजन केले.

ज्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेपोटी स्वतःचे प्राण अर्पण केले त्या शूर शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी दि २१ ऑक्टोबर रोजी स्मृती संचलन केले जाते. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्य तसेच अर्ध सैनिक दलातील शहीद झालेल्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी या पोलीस स्मृतीदिन संचलनाचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes